Education

 आंबेडकरवाद्यांना नम्र विनंती

 डियर आंबेडकराईट्स, 

        आपल्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक जण स्वतःला आंबेडकरवादी किंवा आंबेडकराइट  मानण्यात  गर्व अनुभव करतो. आंबेडकराईट होणे म्हणजे नेमके काय ?आंबेडकराईट  किंवा आंबेडकरवादी  याला आपण कसे डिफाइन करू ?

        कोणी म्हणेल  डॉक्टर आंबेडकरांचे तत्वज्ञान मानणारा, स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या विचारांशी सहमती दाखवणारा खरा आंबेडकराईट. 

        कोणी म्हणेल मी आंबेडकर प्रणित  नवयान बौद्ध तत्त्वज्ञानाला  मानणारा, आहे म्हणून आंबेडकरवादी आहे.  कोणी म्हणेल मी संविधानवादी आहे  मी  संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे.

आणि आपण  आंबेडकरवादी आहोत हे व्यक्त करण्यासाठी   आणि आंबेडकरांविषयी  आपले   प्रेम, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी  तो 14 एप्रिल, धम्मदीक्षा दिन, सहा डिसेंबर या दिवशी दीक्षाभूमी, चैत्यभूमी  इथे जाऊन किंवा ते शक्य नसेल तर जवळच्या विहारात, बौद्ध विहारात जाऊन आपली श्रद्धा व्यक्त करतो, काही दान करतो,  तो जर  बुद्धिजीवी असेल तर या दिवशी होणाऱ्या सभांना उपस्थित राहतो, चर्चासत्रात भाग घेतो.  हे सगळं करणे जरूरी आहे, आपण जी  फिलॉसॉफी मानतो, आपली जी आयडियॉलॉजि  आहे ते ठामपणे व्यक्त  केलेच पाहिजे तसे करणे जरुरी आहे पण  केवळ तेवढे  पुरेसे नाही. डॉक्टर आंबेडकरांबद्दल एका  अत्यंत महत्वाच्या बाबी  कडे आपण दुर्लक्ष करतो ती म्हणजे त्यांचे आपल्या समाजा च्या उत्थानाप्रती  पूर्ण समर्पण.

खरा आंबेडकरवादी तोच आहे जो सामाजिक बांधिलकी  मानतो. ज्या समाजात त्त्यांचा जन्म झाला त्यात जे शोषित आहेत, पीडित आहेत , गरीब किंवा लेस फॉर्च्युनेट  आहेत, जातीव्यवस्थेने  पिडलेले  आहेत, त्यांच्या प्रती आपले कर्तव्य आहे त्यांना पुढे आणण्यास आपण आपल्यापरीने  मदत केली पाहिजे असे जो मानतो  आणि त्याला अनुसरून  पॉझिटिव्ह ॲक्शन घेतो तोच खरा आंबेडकरवादी.  

डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते ‘ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाची परिस्थिती मी बदलू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालेन’

एकदा विधिमंडळात बोलताना  डॉक्टर आंबेडकर म्हणतात “ मी प्रतिज्ञा पूर्वक सांगतो की जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित  आणि सर्व देशाचे हित या संघर्ष निर्माण झाला तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य दिले स्वतःच्या हिताला दुय्यम  मानले, त्याचबरोबर मी एका अशा प्रकारच्या निष्ठेला    बांधला गेलो आहे की मी तिला कधीही अंतर देऊ शकणार नाही ही ती निष्ठा म्हणजे माझा अस्पृश्यवर्ग त्यांच्यात मी जन्माला आलो आहे, त्यांचा मी आहे जीवात जीव असेपर्यंत त्यांना मी अंतर देणार नाही.’’

             पुढे ते म्हणतात मी  दृढनिश्चयपूर्वक सांगतो की जेव्हा अस्पृश्याचे हित आणि देशाचे हित  यामध्ये संघर्ष होईल त्यावेळेस मी माझ्या पुरतो सांगतो की मी अस्पृश्यांच्या हिताला प्राधान्य देईन.  देशाचे हित आधी की माझे  हित  आधी असा प्रश्न उद्भवला तर मी देशाचे हित पाहींन , तसेच माझ्या समाजाचे हित आधी कि  देशाचे हित  आधी असा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा मी अस्पृश्य वर्गाच्या हिताच्या बाजूने उभा राहील’’

इतकी मजबूत त्यांची सामाजिक प्रतिबद्धता होती.

         जगातील सहा श्रेष्ठ विज्ञानांमध्ये त्यांची गणना होत होती, परदेशात राहून ते अफाट पैसा  आणि प्रसिद्धी कमवू शकत होते तिथे त्यांना आरामात आपले आयुष्य जगता आले असते, पण ते उच्च शिक्षण घेऊन परत आलेत आणि आपल्या समाजाच्या हितासाठी अहोरात्र  झटले, प्रखर विरोध सहन केला  हा विरोध एवढा प्रचंड होता की lesser man would have perished , पण ते कुठेही डगमगले नाही आपल्या समाजाला अंतर दिले नाही की, आपल्या समाजाच्या हिताविरुद्ध कोणताही समझोता केला नाही, सतत संघर्षाचा मार्ग अवलंबिला. म्हणून आपल्या समाजासाठी झटणारा आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी शक्य असेल तो प्रयत्न करणारा खरा आंबेडकरवादी.

        उच्च शिक्षणाला डॉक्टर आंबेडकरांनी  वाघिणीचे दूध म्हंटले म्हटले आहे ते लिहितात कोणत्याही समाजाची प्रगती करायची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते, यापुढे जाऊन ते म्हणतात ,’’ आय मेजर प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी  बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस व्हायचं वूमन हवे अचिव्हड’.  एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप काय तर त्या समाजातील स्त्रियांची किती प्रगती झाली आहे हे आहे .

SC/ST देशाच्या लोकसंख्येच्या 25.2% आहेत ते 2011 च्या जनगणनेने जे लोक सुशिक्षित आहेत त्यानुसार फक्त 20% आहेत. फी वाढ आणि शैक्षणिक बजेट मध्ये  कपात या मुळे  या समुदायासाठी शिक्षणाचे स्वप्न आणखी दुर्गम बनले आहे.  

माझ्या websight  वर दिलेल्या statistics वरून स्पष्ट होईल      

एससी, एसटी वर्गाच्या समाजातल्या मुलांना उच्चशिक्षण कसे  कसे दुष्प्राप्य  होत  चालले आहे. सर्व प्रयत्न बहुजन समाजाला उच्च शिक्षण कठीण आणि महागडे करण्याकडे आहे  हे खाली दिलेल्या  तक्त्यावरून स्पष्ट  होईल.

युनिफाई डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम  एज्युकेशन UDISE 2013 -14 च्या   अहवालानुसार   सहा कोटी  होऊन अधिक मुलींनी प्राथमिक स्तरावर नोंदणी करण्यात आली होती सहा वर्षानंतर एवढ्याच मुली सेकंडरी स्तरावर नोंदणी झाली पाहिजे होती तथापि 2019 आणि 20 च्या य यु ड आय एस इ च्या अहवालानुसार म्हटले की केवळ 35 लाख नोंदणीकृत विद्यार्थीनी   होत्या , थोडी बहुत आकडे असतात मानली तरी साडेपाच कोठे मुलींनी उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षण सोडले यामध्ये. 

       केंद्रीय अर्थसंकल्पातील शैक्षणिक खर्चाचा वाटा 2014-15 मधील 4.1% वरून 2019-20 मध्ये 3.4% पर्यंत घसरला. ऑगस्ट 2019 मध्ये, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा शुल्कात सर्वसाधारण श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 100% आणि SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक 2,300% वाढ करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. फी वाढ केवळ शाळांपुरती मर्यादित नाही; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि केंद्रीय विद्यापीठे यासारख्या उच्च शिक्षण संस्थांनीही फी वाढवली आहे. द नॅशनल कॅम्पेन ऑन दलित ह्युमन राइट्स (NCDHR) च्या अहवालानुसार, SC आणि ST बजेट अंतर्गत निधी वाटपामध्ये तफावत आहे. एकूण अर्थसंकल्पापैकी केवळ 4.5 टक्के अनुसूचित जातींसाठी ‘लक्ष्यित योजना’ (समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या योजना) आणि अनुसूचित जातींसाठी केवळ 2.6 टक्के तरतूद करण्यात आली आहे. NCDHR ने निदर्शनास आणून दिले आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान जाहीर होणारा निधी आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या योजनांना वाटप करण्यात येणारा निधी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून मोठी तफावत आहे.

       बौद्ध धम्मात दानाचे फार महत्व आहे. १० पारमिता  पैकी पहिलीच लीच  पारमिता  ही  दान पारमिता  आहे. भिक्षु संघ हा दानावर चालतो , भगवान बुद्धाने आपल्या  उत्पन्नाचे  १० % दान करण्यास सांगितले आहे.  नॉर्मल ऍक्ट ऑफ जेनेरोसिटी  आणि दान पारमिता  मध्ये फरक आहे.. 

        साधं दान मनुष्य कधी कधी करुणेपोटी, दयेपोटी देतो. जेव्हां कोणी खूप गरजू दिसतो. पण दान पारमिता  मध्ये दान देतांना तो दान एक गुण , एक virtue  म्हणुन  प्रॅक्टिस करतो. इथे उपकाराची भावना नसते म्हणुन  अहंकार नसतो.  हे दानाचे कार्य machanically  होत नाही यात शरीराबरोबर मन आणि आणि हृदय पण सामिल असते. दान जे शुद्ध भावनेने  आणि शुद्ध प्रेरणेने दिले जाते त्याला दान पारमिता  म्हणतात. 

             कोणी म्हणेल आम्ही बौद्ध  विहारात दान करतो, दीक्षाभूमी वर दान करतो, भिक्षूंना दान करतो पण त्याच बरोबर आपल्या समाजातील गरीब विद्यार्थी आणि खासकर विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणाला मदत करणे तेवढेच महत्वाचे आहे. आणि हे दान कधी कधी नाही तर नियमित, सामाजिक बांधिलकी आणि दान पारमिता लक्षात ठेऊन करणे जरूरी आहे. 

              SC/ST /OBC वर्गातील आज  जो मिडिल क्लास तयार झाला आहे, जो कंपॅरिटिव्हली चांगल्या स्थितीत आहे  त्यात त्याच्या प्रयत्ना बरोबर  आरक्षण हि मिळाले आहे, तो त्या समाजाचा भाग होता म्हणून त्याला आरक्षण  मिळाले आहे, म्हणून त्याची आपल्या समाजाप्रती जबाबदारी आणि जबाबदेही  जास्त आहे

          एक committed आंबेड्कराईट तयार  करण्याचा आमचा प्रयत्न आहे जो आपल्या समाजाच्या उत्थाना प्रति, आपल्या समाजातल्या गरीब मुलांच्या उच्च शिक्षणाप्रती   पूर्ण समर्पित असेल. 

जय भीम 

आंबेडकर जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. 

Leave A Comment

Your Comment
All comments are held for moderation.